पराभूत भाजप कार्यकर्त्यांचा सेना कार्यकर्त्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

कडोंमपा निवडणुकीनंतर शिवसेना - भाजपच्या कार्यकर्त्यांतील वादाचं पर्यावसन तुंबळ हाणामारीत झालेलं पाहायला मिळालंय.  

Updated: Nov 12, 2015, 04:42 PM IST
पराभूत भाजप कार्यकर्त्यांचा सेना कार्यकर्त्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी title=

ठाणे : कडोंमपा निवडणुकीनंतर शिवसेना - भाजपच्या कार्यकर्त्यांतील वादाचं पर्यावसन तुंबळ हाणामारीत झालेलं पाहायला मिळालंय.  


 

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री दीड वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलीय. भाजपचे प्रभाग क्रमांक ९६ - जाईबाई नगरचे भाजपचे उमेदवार संदीप जाधव यांचा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश जाधव यांनी पराभव केला होता. त्याचाच राग मनात धरून संदीप जाधव यांनी आपले भाऊ विशाल जाधव, सचिन जाधव यांच्यासहीत काही कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते प्रमोद ओव्हल, नितीन जाधव आणि देवेंद्र प्रसाद यांना लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जबर मारहाण केल्याचं समजतंय. 

या मारहाणीत शिवसेना कार्यकर्ते प्रमोद ओव्हळ आणि चंदू प्रसाद शर्मा हे गंभीर जखमी झालेत. दरम्यान, स्थानिक आमदाराच्या दबावामुळे पोलिसांनी घटनेची तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केलाय.

कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना - भाजपनं हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली असली तरी या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांत सुरू झालेली अटीतटीची स्पर्धा कोणत्या स्थरापर्यंत पोहचलीय, याची प्रचिती या घटनेमुळे आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.