कुंभमेळाव्यात साधूंच्या अतिरेकाचा धक्कादायक प्रकार

कुंभमेळ्यामध्ये साधूंच्या अतिरेकाचा आणखी एक धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील आवाहन आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी चक्क बंदुकीनं हवेत बार उडवण्याचा पराक्रम साधू महंतांनी केला आहे.

Updated: Aug 19, 2015, 06:59 PM IST
कुंभमेळाव्यात साधूंच्या अतिरेकाचा धक्कादायक प्रकार  title=
संग्रहीत

नाशिक : कुंभमेळ्यामध्ये साधूंच्या अतिरेकाचा आणखी एक धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील आवाहन आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी चक्क बंदुकीनं हवेत बार उडवण्याचा पराक्रम साधू महंतांनी केला आहे.

जल्लोषाच्या भरात साधू महंतांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांनी १२ बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. विशेष म्हणजे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरात अन्य एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना, तीर्थनगरीत हा प्रकार घडल्यानं चर्चेचा विषय ठरलाय. 

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, सुरक्षारक्षक आणि शस्त्र ताब्यात घेण्यात आलंय. या गोळीबारामुळे आखाड्यांमधील बदलती मानसिकता अधोरेखित होतेय, अशी चर्चा सुरु आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.