पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळून तीन ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. दरड कोसळल्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद पडली होती. आता एकामार्गानं वाहतूक सुरू करण्यात आल्याचं कळतंय.

Updated: Jul 19, 2015, 05:36 PM IST
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळून तीन ठार title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई/पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. दरड कोसळल्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद पडली होती. आता एकामार्गानं वाहतूक सुरू करण्यात आल्याचं कळतंय.

खंडाळा-बोरघाटमधील आडोशी बोगद्याजवळ टाटा इंडिगो कारवर दरड कोसळली असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याचे समजते. जखमींना लोणावळ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आलंय. 

दरड कोसळल्यानं एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी झाली असून मुंबई-पुणेकडे जाणा-या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

जुना मुंबई-पुणे रस्त्यावरही ट्राफिकमुळं जॅम लागलेला आहे. खोपोलीतही वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

दरम्या, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असून संबंधित अधिकारी आणि आवश्यक तांत्रिक बाबी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलीय. शिवाय वारंवार दरड कोसळणाऱ्या ठिकाणी विशेष खबरदारी सूचना देण्यात येण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाडी आज रात्री आठ वाजता सोडण्यात येणार आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई दोन्ही बाजूंनी गाडी सोडण्यात येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.