जमीन घोटाळा : एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी

एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2017, 03:27 PM IST
जमीन घोटाळा : एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी title=

नागपूर : भोसरीतल्या एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकणी माजी महसुलमंत्री एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी सुरू झालीय. नागपूरमध्ये त्यांची आज निवृत्त न्यायाधीश डी एस झोटींग आयोगानं चौकशी केली. 

खडसे आपल्या वकिलासोबत चौकशी आयोगासमोर हजर होते. त्यामुळे आता खडसेंच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत. तर दुसरीकडे याच प्रकरणी राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारकडून कारवाई होत नसल्याची नाराजी कोर्टानं व्यक्त केली.

तसेच ही शेवटची संधी असल्याची तंबीही मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलीय. पुढील सुनावणी ७ मार्चला होणार आहे. खडसेंवर कारवाई करण्यासाठी चौकशी आयोगाने ६ आठवड्यांचा आणखी वेळ मागितल्याची माहिती राज्य सकारने दिली.