खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात

रायगड जिल्ह्यातल्या खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात झाला. या अपघातात केवळ एका झाडामुळे भीषण दुर्घटना टळली. 

Updated: Mar 19, 2017, 07:48 PM IST
खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात  title=

रायगड : रायगड जिल्ह्यातल्या खोपोली बोरघाटात मिनी बसला अपघात झाला. या अपघातात केवळ एका झाडामुळे भीषण दुर्घटना टळली. 

पुण्याहून खोपोलीला ही बस येत होती. मात्र घाटात बस कलांडल्यामुळे हा अपघात झाला. पुण्यातल्या जेष्ठ नागरिक संघाची ही बस होती. यातील 20 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. 

दक्षिण पुण्यातल्या जेष्ठ नागरिक संघाची ही मिनीबस खोपोलीतल्या गगनगिरी आश्रमात दर्शनासाठी येत असताना, बोरघाटातल्या तीव्र वळणावर रस्त्याच्या खाली ही मिनीबस कलंडली. या अपघातातल्या जखमींवर नगरपालिका रुग्णालयात उपचार करुन नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.