हिंगोलीवर राष्ट्रवादीला पुन्हा फडकवायचाय आपलाच झेंडा!

मराठवाड्यातली मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हिंगोली नगर पालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कोंग्रेसकडे आहेत 

Updated: Nov 23, 2016, 07:59 PM IST
हिंगोलीवर राष्ट्रवादीला पुन्हा फडकवायचाय आपलाच झेंडा! title=

गजानन देशमुख, हिंगोली : मराठवाड्यातली मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हिंगोली नगर पालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कोंग्रेसकडे आहेत. जिल्ह्यातील दिग्गज राजकारण्यांच या नगर पालिकेकडे लक्ष लागलय. त्यामुळं अनेकांनी आपलाच झेंडा या नगर पालिकेवर फडकावा म्हणून संपूर्ण ताकत लावली आहे. अनेक पक्षांनी धुरधर राजकारण्यांना निवडनुकीच्या रिंगणात उतरवलय तर एका पक्षाने मात्र सामाजिक कार्यकर्त्यांना या गर्तेत उतरवल्याने हिंगोलीची निवडणूक रंगतदार बनली आहे.

मराठवाड्यातली मोठी आणि महत्त्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख... गेल्या 15 वर्षांपासून हिंगोली नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय. हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी व्यूहरचना आखून माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलंय. 

काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर गेली 15 वर्षे हिंगोली विधानसभेचे आमदार होते. पण त्यांना या काळात कधीही हिंगोलीच्या नगर पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवता आला नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून काँग्रेसवासी झालेले शेख निहाल हाजी इस्माईल यांना  नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन नगराध्यक्षपदावर दावा केलाय. 

हिंगोली शहरात एकूण 64 हजार मतदान असून त्यात मुस्लिमांची मतं अधिक प्रमाणात आहेत. या मतांवर आणि दलितांच्या मतांवर डोळा ठेऊन एमआयएम आणि भारीपने तिसरी आघाडी स्थापन करत आपलाच झेंडा हिंगोलीच्या नगर पालिकेवर फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय. 
 
हिंगोली शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या हाती सत्ता द्या असं आवाहन राष्ट्रवादी मतदारांना करतेय. एकीकडे अनेक पक्षांनी अनुभवी नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरवले असतांना शिवसेनेनं मात्र सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मुळे यांच्या रूपानं एक नवीन चेहरा अध्यक्षपदासाठी पुढे केलाय. या सर्वांपैकी हिंगोलीचा सुजाण मतदार आता कुणाला निवडतात हे येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.