कुंभ मेळाव्याला आलेल्या अनोळखी परिवाराला मदत

शहरातीला पालीवाल कुटुंबाने एका राजस्थानी कुटुंबाला मदत केली आहे, कुंभ मेळाव्यासाठी एक राजस्थानी कुटुंब शहरात आलं होतं, पण त्यांना राहण्याची कुठेही सोय नव्हती, सर्व हॉटेल्स बुक असल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली होती.

Updated: Sep 21, 2015, 05:11 PM IST
कुंभ मेळाव्याला आलेल्या अनोळखी परिवाराला मदत title=

नाशिक : शहरातीला पालीवाल कुटुंबाने एका राजस्थानी कुटुंबाला मदत केली आहे, कुंभ मेळाव्यासाठी एक राजस्थानी कुटुंब शहरात आलं होतं, पण त्यांना राहण्याची कुठेही सोय नव्हती, सर्व हॉटेल्स बुक असल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली होती.

राजस्थानहून आलेल्या कुटुंबाचा पेहराव पाहून ते राजस्थानी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा पालीवाल परिवार त्यांना आपल्या घरी घेऊन गेले, त्यांना खाण्यापिण्याची आणि झोपण्याची देखील सोय केली, अतिथी देवो भव म्हणतात, त्या प्रमाणे त्यांची सेवा केली.

राजस्थानहून महेंद्र आझाद त्यांची पत्नी आणि भाऊ आणि वहिनी हे कुंभ मेळाव्यासाठी नाशिकला आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.