नाशिकमध्ये स्पावर छापा, ८ तरूणी ताब्यात

नाशिकमध्ये आज दुपारी कॉलेजरोडवरील स्पावर पोलिसांनी छापा टाकला आहे.

Updated: May 24, 2017, 04:05 PM IST
नाशिकमध्ये स्पावर छापा, ८ तरूणी ताब्यात title=

मुकुंद कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये आज दुपारी कॉलेजरोडवरील स्पावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात ८ तरूणींसह ५ तरूणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली येथे अनैतिक प्रकार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आणखी चौकशी सुरू केली आहे. अगदी स्पा सारख्या दिसणाऱ्या या ठिकाणी असा अनैतिक प्रकार चालत असल्याची कुणालाही कल्पना नव्हती.