राष्ट्रवादी उमेदवाराचे तिकिटासाठी देवाला साकडे

कोकणात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेय. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गावोगावचे सर्वच पक्षांचे नेते अनेक खटपटी करत असतात. कोणी नेत्यांचे उंबरठे झिजवतं तर कोणी सेटिंग करतं. सिंधुदुर्गात मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी नेत्यांच्या फंदात न पडता थेट देवाकडेच तिकीट मागितलंय.

Updated: Sep 18, 2014, 02:31 PM IST
राष्ट्रवादी उमेदवाराचे तिकिटासाठी देवाला साकडे title=

सिंधुदुर्ग : कोकणात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेय. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गावोगावचे सर्वच पक्षांचे नेते अनेक खटपटी करत असतात. कोणी नेत्यांचे उंबरठे झिजवतं तर कोणी सेटिंग करतं. सिंधुदुर्गात मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी नेत्यांच्या फंदात न पडता थेट देवाकडेच तिकीट मागितलंय.

कणकवलीमधून उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश, काँग्रेस आमदार विजय सावंत यांनी फिल्डिंग लावली असताना रावराणेही तेथून लढण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे तिकिटासाठी त्यांनी चक्क आचीरणे गावच्या देवीलाच असं गा-हाणं घातलंय.  

पक्षाकडून मलाच तिकिट मिळेल आणि आपण येथून निवडणून येणार असल्याचा दावा रावराणे यांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.