राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला, सस्पेन्स कायम

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनंही प्राचाराचा नारळ फोडला. मुंबईतल्या वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि सहयोगी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. 

Updated: Sep 6, 2014, 10:37 PM IST
राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला, सस्पेन्स कायम title=

मुंबई : निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनंही प्राचाराचा नारळ फोडला. मुंबईतल्या वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि सहयोगी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. 

शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या भाषणातून आघाडीबाबतची साशंकता दिसून आली. पवारांनीही आपल्या भाषणात आघाडीबाबत स्पष्ट संकेत दिले नाहीत. जागा वाटबाबचा घोळ लवकरच सुटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली तर पटेलांनी जागा वाढवून देण्याची आग्रही भूमिका मांडली. जागा वाढवून घेण्याबाबत राष्ट्रवादीनं अजूनही आशा सोडलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी लाचार नाही हेदेखील काँग्रेसनं समजून घेण्याचा इशारा पटेलांनी दिलाय. 

या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांनी प्रचार आणि विजय मिळवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. आताचा गणेशोत्सवाचा संदर्भ घेत ‘लोक राष्ट्रवादीला पुढल्या वर्षी लवकर या’ असं म्हणायला हवेत, अशी कोटी अजित पवारांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर भाजपची खिल्ली उडवली. 

भाजपच्या अमित शहांना प्रत्यूत्तर…
राज्यात 11 लाख कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या कार्यक्रमात या आरोपाला उत्तर दिलं. गेल्या 15 वर्षांत 3 लाख 75 हजार कोटींचे सिंचन प्रकल्प झाले असताना त्यात 11 लाख कोटींचा घोटाळा कसा होईल, असा सवाल पवारांनी केला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही आपल्या भाषणात अमित शाह यांनाच टार्गेट केलंय. स्वतः अनेक खटल्यांमध्ये आरोपी असलेल्या शाह यांना आमच्यावर आरोप करायचा अधिकार नाही, असं पवार यांनी म्हटलंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.