'धनंजय मुंडे शरद पवारांपेक्षा मोठे झाले'

बीडमध्ये भाजपच्या खेळीनं विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिलाय.

Updated: Mar 21, 2017, 04:22 PM IST
'धनंजय मुंडे शरद पवारांपेक्षा मोठे झाले' title=

बीड : बीडमध्ये भाजपच्या खेळीनं विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिलाय. राष्ट्रवादीचेच माजी मंत्री सुरेश धस यांनी त्यांच्या सात समर्थकांसह भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पंकजा मुंडेंची सरशी झालीय.

जिल्ह्यातील काही नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा मोठे झालेत. त्यामुळे आपण अजित पवार यांना सांगून भाजपला साथ दिली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये स्वतःला शहाणे समजणारे लोक जमा झाले आहेत. सगळे निर्णय तेच घेत आहेत, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.  जिल्ह्यातील नेत्यांच्या या वागण्यामुळे आपण भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय.

दरम्यान शरद पवार हेच आपलं दैवत आहेत आणि अजित पवार हेच माझे नेते आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही आणि सोडणारही नाही असं धस यांनी स्पष्ट केलं आहे.