त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आता सर्वांनाच प्रवेशबंदी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला प्रवेशाच्या वादावरुन वातावरण तापलेलं आहेच. आता मात्र मंदिर प्रशासनाने मंदिराच्या गाभाऱ्यात रविवारपासून सर्वसामान्यांनाही प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे.   

Updated: Apr 4, 2016, 01:56 PM IST
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आता सर्वांनाच प्रवेशबंदी title=

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला प्रवेशाच्या वादावरुन वातावरण तापलेलं आहेच. आता मात्र मंदिर प्रशासनाने मंदिराच्या गाभाऱ्यात रविवारपासून सर्वसामान्यांनाही प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. 

या बंदीविरोधात आता आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वरमधील सर्वपक्षीय आंदोलकांनी विश्वस्तांविरोधात मोर्चा काढला. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. 

विश्वस्तांनी मात्र त्यांच्या मागण्यांना उत्तर देताना या मागण्यांवर 'आम्ही विचार करू' असे उत्तर दिले आहे. या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय आंदोलक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता मिळत आहे.