पंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस

येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.

Updated: Jun 30, 2015, 01:07 PM IST
पंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस title=

औरंगाबाद : येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.

रेडीको कंपनी महिला व बालविकासमंत्री पंकजा पालवे आणि त्यांच्या पतीची भागीदारी असलेली कंपनी आहे. रेडिको कंपनीसह प्रदूषण नियामक मंडळावरही कोर्टानं नोटीस बजावलीय. कंपनीवर कारवाई केली नाही म्हणून ही नोटीस बजावण्यात आलीय. 

दोन आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सुखाना नदीत प्रत्येक एक किलोमीटरनंतर नदीच्या पाण्याची चाचणी करून, अहवाल देण्याच्या सूचना प्रदूषण नियामक मंडळाला देण्यात आल्यात. प्रदूषण नियामक मंडळानं आधीच कंपनीला काम थांबवण्याचे आदेश दिलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.