पोलिसाने बस स्टँडवर महिलेला दंडुक्याने झोडपले

जिल्ह्यातील चाळीसगाव बस स्थानकावर शशिकांत महाजन या पोलीस कॉन्स्टेबलनं एका ३५ वर्षीय महिलेला चोरीच्या आरोपावरून भर गर्दीत दंडुक्याने अमानुष मारहाण केलीय. 

Updated: Feb 24, 2015, 06:37 PM IST
पोलिसाने बस स्टँडवर महिलेला दंडुक्याने झोडपले title=

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव बस स्थानकावर शशिकांत महाजन या पोलीस कॉन्स्टेबलनं एका ३५ वर्षीय महिलेला चोरीच्या आरोपावरून भर गर्दीत दंडुक्याने अमानुष मारहाण केलीय. 

बसमध्ये गर्दीत चढताना या महिलेने एका महिला प्रवाशाचे सोन्याचे पेंडल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या महिलेच्या कडेवर असलेल्या बाळाला ब्लेड लागल्याने त्यानं आरडा ओरडा केला. त्यामुळं या चोरीच्या प्रयत्नाचं बिंग फुटलं.  व्हिडीओ बातमीच्या खाली पाहा

तिथे ड्युटीवर असलेला शशिकांत महाजन या पोलिस कॉन्स्टेबलनं या महिलेचे केस पकडून तिच्या पाठीवर आणि हातापायांवर दंडुक्यानं बेदम मारहाण केली. 

काही प्रवाशांनी पोलीस कर्मचाऱ्याकडून या महिलेला करण्यात आलेल्या मारहाणीची क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झालीय. पोलीस अधीक्षकांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केलीय. 

पाहा पोलिस हवालदार महिलेशी कसा वागलाय?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.