एसीबीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पोलिसाचा हवेत गोळीबार

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची घटना आज नागपुरात पाहायला मिळालीय. 

Updated: Jan 6, 2016, 05:06 PM IST
एसीबीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पोलिसाचा हवेत गोळीबार title=

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची घटना आज नागपुरात पाहायला मिळालीय. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गावंडे यांनी हा हवेत गोळीबार केलाय. हवेत हा गोळीबार केल्यानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. पाचवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. सर्व्हिस लिव्हॉर्वरनं गावंडे यांनी हवेत गोळीबार केला. 

दरम्यान, नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय. राजेश राऊत असं या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून, १५ हजार रूपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली.

नागपुरात आज दिवसभरात एसीबीनं दोन लाचखोर पोलिसांना अटक केलीय.