या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविषयी दाखवली संवेदनशीलता

अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले आहेत. 

Updated: Sep 13, 2016, 01:17 PM IST
या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविषयी दाखवली संवेदनशीलता title=

नागपूर : अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले आहेत. 

जाधव याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण पोलिस दलात शेतकऱ्यांचा विचार करणारा, एवढा संवेदनशील अधिकारी आपण पहिल्यांदाच चर्चेत आला आहे.

जाधव यांच्या या उपक्रमामुळे पोलीस दलाचा थेट ग्रासरूटशी संबंध जोडला जाणार आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची होत असलेली अवहेलना आणि फसवणूक थांबण्यात मदत होणार आहे.

विठ्ठल जाधवांच्या पत्रकातील सूचना 

१) जास्तीत जास्त शेतकरी मित्र बनवणे.

२) बँक आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या अडचणी दूर करणे.

३) व्यसनाधीन शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांना व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन करणे.

४) शेतकऱ्याच्या मुलींच्या लग्नासाठी मदत करणारे दानशूर शोधणे, प्रसंगी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे.

५) कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन दात्यांच्या मदतीनं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे.

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आयजी साहेबांनी हे पाऊल उचललं आहे. पण, पोलिसांवर आधीच भार असताना हा अधिकचा भार टाकण्याचा हे प्रयोग, निरर्थक असल्याचं शेतकरी नेत्यांना वाटतं.