पोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं

केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.

Updated: Nov 26, 2016, 05:42 PM IST
 पोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं title=

औरंगाबाद: केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.
 
केंद्रीय स्पर्धा परीक्षांद्वारे नियुक्त केलेल्या महाराष्ट्र आणि गोव्यातील पोस्टमन, एमटीएस, मेलगार्ड पदासाठी २९ मार्च २०१५ रोजी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

विभागाअंतर्गत तीन समित्यांनी चौकशी केल्यानंतर १,७०० उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यातील ५०० पेक्षा अधिक उमेदवारांना ५ मे पासून रूजू करून नियुक्तपतत्र ही देण्यात आले. त्यानंतर सर्व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग फरकासह लागू आला होता. परंतू शुक्रवारी अचानक संबंधीत सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.

औरंगाबादच्या संबंधीत ३९ कर्मचाऱ्यांनी टर्मिनेट ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांना पोस्टाने एका खोलीत कोंडून ठेवले. तसेच संबंधीत कर्मचार्‍यांना पोस्टाने दोन महिन्याचा पगार देण्याचे आमिष दाखवले आणि पुढील भरतीत सर्वांना संधी मिळणार असे पोस्ट अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोस्ट विभागीय कार्यालयाबाहेर सेवा समाप्ताची कारणे समजून घेण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. औरंगाबाद पोस्ट विभागीय अधिकाऱ्यांनी सेवा समाप्तीच्या आदेशावर ठोस कारण सांगण्यास स्पष्ट नकार दिला.