पुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून

शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.

Updated: Dec 23, 2016, 03:45 PM IST
पुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून  title=

पुणे : शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे मेट्रो रेल'चे भूमीपूजन झाले. हा भूमीपूजनाचा कार्यक्रम पी.एम.टी डेपो, स्वारगेट येथे झाला. पुण्यामध्ये मेट्रो आणण्यासाठी मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. चव्हाणांमुळे पुणे मेट्रोला मान्यता मिळाल्यानं त्यांच्याच हस्ते कुदळ मारून काँग्रेसने भूमीपूजन उरकले.

 पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस रुसून बसली होती. दरम्यान, यशस्वी डावपेज टाकत आपल्या पदरात कार्यक्रम व्यासपीठावर स्थान मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निमंत्रण न दिल्याने वेगळं भूमीपूजन करायची भूमिका घेतली होती. 

पुणे पालिकेमध्ये याबाबत ठराव मंजूर करून घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते हा कार्यक्रम होईल, असे महापौर जगताप यांनी केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्ती केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा विरोध मागे घेतला. 

दरम्यान, पालिकेत ठरावाबाबत काँग्रेसनेही राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. भाजपने पवारांना स्थान असेल असे सांगितल्याने काँग्रेसचा तिळपापड झाला आणि त्यांनी आजच भूमीपूजन उरकून घेतले.