FTIIचा वाद चिघळला, पोलिसांनी मध्यरात्री केली ५ विद्यार्थ्यांना अटक

पुण्यात आंदोलन करणाऱ्या FTIIच्या पाच विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. १७ विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. अटक केलेल्या विद्यार्थ्यांविरोधात दंगल घडवल्याचे गुन्हे नोंद करण्यात आलेत. 

Updated: Aug 19, 2015, 03:54 PM IST
FTIIचा वाद चिघळला, पोलिसांनी मध्यरात्री केली ५ विद्यार्थ्यांना अटक title=

पुणे: पुण्यात आंदोलन करणाऱ्या FTIIच्या पाच विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. १७ विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. अटक केलेल्या विद्यार्थ्यांविरोधात दंगल घडवल्याचे गुन्हे नोंद करण्यात आलेत. 

FTII संचालक प्रशांत पाठराबे यांनी सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी १७ विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केलीय. विद्यार्थ्यांनी मात्र पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केलाय.

सोमवारपासून २००८च्या बँचच्या प्रकल्प मुल्यांकनाला सुरुवात झाली होती. प्रकल्प आहे तसे सादर करण्याचे आदेश विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेऊन ६ तास पाठराबे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. पोलीस आल्यानंतर पाठराबे यांची सुटका केली होती. 

FTIIच्या आंदोलनाचा मंगळवारी ६८वा दिवस होता. विद्यार्थ्यांचं अटक सत्र सुरु झाल्यानं आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.