अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये पर्दाफाश झालाय. एक लिटर दुधाच्या पाकिटातून पन्नास मिलीलीटर दूध बाहेर काढलं जायचं. त्यात तेवढंच नळाचं पाणी भरुन भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत होती. 

Updated: Jul 22, 2014, 08:54 PM IST
अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश title=

ठाणे: अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये पर्दाफाश झालाय. एक लिटर दुधाच्या पाकिटातून पन्नास मिलीलीटर दूध बाहेर काढलं जायचं. त्यात तेवढंच नळाचं पाणी भरुन भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत होती. 

काही मुलं अशा दुधामुळं आजारी पडल्यानं हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक झालीये. सतिश निम्हल्ला आणि मोहम्मद अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत. 

सतीश हा जिग्नेश नावाच्या होलसेलरकडून सकाळी होलसेल भावात दुध विकत घेवून आपल्या राहत्या घरात मुळ पाकिट एक साईडनं कापून त्यातील पंन्नास मि.ली. दुध बाहेर काढायचा आणि त्यात नळाचं पाणी तेवढंच भरायचा.

कसा करायचा भेसळ?

सडपातळ दिसणारा सतीश हा घरात दुधाच्या थैली नेवून त्यात नळाचं पाणी मिसळीत असे, स्टोच्या दोन पिन एकत्र करुन त्याच्या चिमटीत थैली धरुन त्याद्वारे फाडलेलं दुधाचं पाकिट मेणबत्ती किंवा लायटरची आग देवून पूर्ववत करायचा. त्यामुळं तात्काळ दुधातील भेसळ लवकर नागरिकांना कळत नसे. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून या दोघांचा चालत होता. परंतु पावसाळाच्या दिवसात नळातून येणारे दुषित पाणी दुधात मिसळल्यानं हा प्रकार ऊघडकीस आला आहे. 

विरार पुर्वेकडील विजयानंद पार्क इथं राहणाऱ्या सुहासिनी पालवनकर यांच्या दिड वर्षाच्या मुलासाठी मो. फ़ुरखान यांच्याकडून नामांकित अमुल दुधाच्या रोज एक लिटरचं पाकिट विकत घेत असत. परंतु मागील अनेक दिवसांपासून त्यांचे मुलं ताप, सर्दी, खोकल्यानं ग्रस्त झाले होते. विरार सह मुंबई इथल्या बालरोग तज्ञांकडे त्यांनी दाखवलं तेव्हा प्रत्येकानं दुध बंद करा असा सल्ला दिला तेव्हा दुधाच्या पाकिटावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं असता हा सर्व भेसळयुक्त दुधाचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी त्यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता. विरार पोलिसांनी आरोग्य खात्याशी संपर्क करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केला आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.