रायगडात वॉटर पार्कमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू

रायगडच्या अॅडलॅब इमॅजिकमध्ये पाण्यात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जैनब मोईज बक्समूसा असं या चिमुकलीचं नाव आहे.

Updated: May 29, 2015, 11:35 PM IST
रायगडात वॉटर पार्कमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू  title=

अलिबाग : रायगडच्या अॅडलॅब इमॅजिकमध्ये पाण्यात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जैनब मोईज बक्समूसा असं या चिमुकलीचं नाव आहे.

मुंबईच्या अंधेरीतील साठ जणांचा ग्रुप सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इमॅजिका पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी वॉटर पार्कच्या पाण्याचा आनंद घेताना जैनब बुडाली आणि त्यात गुदमरुन तिचा मृत्यू झाला.

पाण्यात बुडाल्यानंतर तिला बाहेर काढण्य़ात आलं. मात्र हॉस्पिटलला नेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. उल्लेखनीय म्हणजे, या घटनेची संपूर्ण जबाबदारी मृत चिमुकलीच्या आईनं पोलिसांसमोर स्वीकारलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.