राज ठाकरे यांनी उड़वली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

 एक असतो बसलेला मुख्यमंत्री आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री.... बसवलेला मुख्यमंत्री निर्णयच घेऊ शकत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची खिल्ली उडवली. 

Updated: Sep 4, 2015, 06:35 PM IST
 राज ठाकरे यांनी उड़वली मुख्यमंत्र्यांची खिल्ली title=

सिंधुदुर्ग :  एक असतो बसलेला मुख्यमंत्री आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री.... बसवलेला मुख्यमंत्री निर्णयच घेऊ शकत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची खिल्ली उडवली. 

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. सिंधुदुर्गात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, समुद्र किनाऱी होणाऱ्या बांधकामासाठी सीआरझेडची भीती फक्त महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांमध्ये समुद्र किनारी रिसॉर्ट वगैरे ठोकून दिले आहेत. तिकडे कोणी नाही विचारत. ते प्रथम विचार करतात ते आपल्या राज्याचा आणि आपल्या माणसांचा... आपल्याकडे निर्णयच घेतले जात नाही. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले. एक असतो बसलेला मुख्यमंत्री आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री... बसवलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. लोकांनी बसवलेला आणि स्वतः बसलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.