राज ठाकरेंनी कापला ओवेसींचा चेहरा असलेला केक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ४८ वा वाढदिवस. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनीच आणलेला केक कापून राज यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या मात्र या केकवर होते एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांचे चित्र. वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यकर्त्यांनी थेट ओवेसींचे चित्र असलेला केक कापण्यासाठी राज ठाकरेंसमोर ठेवला. राज ठाकरेंनी देखील त्यावर सुरी चालवत वाढदिवस साजरा केला.

Updated: Jun 14, 2016, 04:00 PM IST
राज ठाकरेंनी कापला ओवेसींचा चेहरा असलेला केक title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ४८ वा वाढदिवस. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनीच आणलेला केक कापून राज यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या मात्र या केकवर होते एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांचे चित्र. वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यकर्त्यांनी थेट ओवेसींचे चित्र असलेला केक कापण्यासाठी राज ठाकरेंसमोर ठेवला. राज ठाकरेंनी देखील त्यावर सुरी चालवत वाढदिवस साजरा केला.

MIM ची प्रतिक्रिया

एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे विजणारा दिवा आहे. तो आता फडफडतोय. आपल्याला आणि पक्षाला आता कोणीही विचारत नसल्याने राज ठाकरेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. मी राज ठाकरेंचा निषेध करतो अशी जळजळीत प्रतिक्रिया आमदार वारिस पठाण यांनी दिली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि राज ठाकरे यांनी निवडलेला हा मार्ग वादात सापडण्याची चिन्ह आहे.