राज ठाकरेंची ओवीसी बंधूंना तंबी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ओवीसी बंधूवर टीका केली आहे. 

Updated: Aug 10, 2015, 11:45 PM IST
राज ठाकरेंची ओवीसी बंधूंना तंबी title=

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ओवीसी बंधूवर टीका केली आहे. 

राज ठाकरे ओवीसी बंधूविषयी बोलतांना म्हणाले, निवडणुकांच्या तोंडावर लोकांची माथी भडकविणारी ही माणसे... ते दोन भाऊ ओवेसी, यांच्या वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. 

महाराष्ट्रात वेडं वाकडं घडविण्याचा प्रयत्न केला, तर राज ठाकरेशी गाठ आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढले. 

आझाद मैदानावर उसळलेल्या हिंसेनंतर आपण मोर्चा काढून उत्तर दिलं होते. सर्व जण नंतर जागे झाले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.