पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

पारनेर तालुक्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आलाय. यात आरोपी पोपट साळवेला अटक करण्यात आलीये. 

Updated: Oct 9, 2016, 01:16 PM IST
पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न title=

 पारनेर: पारनेर तालुक्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आलाय. यात आरोपी पोपट साळवेला अटक करण्यात आलीये. 

पिडीत मुलगी बहीण आणि भावासह घराजवळ खेळत असताना आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेतात नेलं आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पिडीताचे नातेवाईकाच्या गाडीचा आवाज आल्याने आरोपीने पळ काढला.. दरम्यान पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोपट साळवे याला अटक कऱण्यात आलीये.