नंदूरबारमधील मोहन भागवतांचे भाषण

Updated: Jan 14, 2016, 09:51 PM IST
नंदूरबारमधील मोहन भागवतांचे भाषण  title=

 मुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज जोरदार शक्तीप्रदर्शन केलं... 
 
 सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सातपुडा हिंदु मेळावा घेण्यात आलाय. यामध्ये सुमारे 40 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भागवत यांनी पुन्हा एकदा भारतीयत्व हेच हिंदुत्व असल्याचं सांगितलं. 
 
 परदेशात भारतीय व्यक्ती हिंदू म्हणूनच ओळखली जाते, असा दावाही त्यांनी केला...पुढील काळात भारत जगाच्या समस्या सोडवून विश्वगृह बनेल असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
 
 या हिंदू मेळाव्याला आदिवासी संघटनांचा विरोध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच नंदूरबारची बाजारपेठही आज बंद ठेवण्यात आली होती...

मोहन भागवत यांचा नंदूरबारमधील भाषण व्हिडिओ