चंद्रपुरातील अफवेने सुट्या पैशांची चणचण

आता चंद्रपुरात नव्या अफवेनं डोकं वर काढलं आहे. 10 रुपयाचं नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा सध्या चंद्रपूरात पसरली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 22, 2016, 11:42 AM IST
चंद्रपुरातील अफवेने सुट्या पैशांची चणचण title=

चंद्रपूर : नोटाबंदीनंतर रोज नवनव्या अफवांचं पेव फुटताना दिसत आहे. आता चंद्रपुरात नव्या अफवेनं डोकं वर काढलं आहे. 10 रुपयाचं नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा सध्या चंद्रपूरात पसरली आहे.

या अफवेने चंद्रपुरातील छोटे बाजार, भाजी मंडई असो की साधा दुकानदार सर्वच त्रस्त झालेत. एकीकडे सुट्ट्या पैश्यांची चणचण असताना या अफवेमुळे अर्धमेला झालेला बाजार अस्वस्थ झाला आहे. 

या अफवेचा जोर एवढा मोठा आहे की ग्राहकाने दुकानदाराला नाणे दिल्यावरही ते नाकारलं जात आहे.

नोटाबंदीमुळे बँक कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढलाय. त्यातच बँका आणि सहकारी पतसंस्था ही नाणी आणूच नका, असा सल्ला ग्राहकांना देत असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. 

सुरळीत चालणाऱ्या बाजारात मुद्दाम असंतोष पसरवण्याचं काम समाजकंठक करताहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरीक करत आहेत.