जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत. 

Updated: Jan 13, 2016, 07:22 PM IST
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न title=

सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत. 

तुकाराम मुंढे यांनी झी २४ तासला याबाबत माहिती दिली. आपल्यावर कोणताही दबाव आला, तरी आता आपण झुकणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करणारचं, सरकारचं माफिया विरोधी नवा कायदा देखील यासाठी चांगला आहे, असं दबंग जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात एक प्रकारे मोहिमच काढली आहे, राज्यात फार कमी जिल्हाधिकारी वाळू माफियांवर कारवाई करण्यास धजावतात असे चित्र आहे.