सांगली-रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार, १० जणांना अटक

सांगली आणि रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार करणा-या टोळ्यांच आज शिकार झाल्या. सांगलीत बहेलिया टोळीत एकाला आणि रत्नागिरीत १० जणांना अटक करण्यात आलीय.

Updated: Dec 4, 2014, 09:03 AM IST
सांगली-रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार, १० जणांना अटक  title=

सांगली, रत्नागिरी : सांगली आणि रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार करणा-या टोळ्यांच आज शिकार झाल्या. सांगलीत बहेलिया टोळीत एकाला आणि रत्नागिरीत १० जणांना अटक करण्यात आलीय.

सांगलीमध्ये कुख्यात शिकारी बहेलिया गँगच्या दीपक जिल्लीला तर कोकणातल्या जंगलांत अवैधरित्या शिकार करणाऱ्या दोन टोळ्यांना जेरबंद करण्यात आलंय. मिरजमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ६६ छोटे बॉम्ब, २ किलो चंदन, ३ पिंजरे, कोयते, २ कु-हाडी आणि कस्तुरीच्या ७ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

वनाधिका-यांनी मिरज रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान इतर आरोपी पळून गेले. तर दुसरीकडे कोकणात पिंपर गावच्या धरणाजवळ शिकार करणा-या ५ जणांना फॉर्च्युनर गाडीसह अटक केली. या गाडीत बेकायदेशीर बंदुकही आढळून आलीय.

गुहागर तालुक्यातल्या चिंद्रवळे गावात ५ शिका-यांना तवेरा गाडीसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक बंदुक आणि एक मृत ससा पोलिसांनी जप्त केला. या दोन्ही घटनेतून पोलिसांनी तब्बल २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बॉम्बच्या सहाय्याने शिकार!

चरबीत किंवा पिठाच्या कणकेत गुंडाळलेले छोटे बॉम्ब जंगल परिसरात ठेवले जातात. हे बॉम्ब लिंबूच्या आकारचे असतात.

वाघ किंवा कुठल्याही वन्यजीवानं ते खाण्याचा प्रयत्न केला की या बॉम्बचा स्फोट होतो. त्यात वाघ, वन्यप्राणी एकतर मरतात किंवा बेशुद्ध पडतात. त्यानंतर हे शिकारी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात वाघांच्या कातडीला लाखो रुपये मिळत असल्यामुळे शिकार केली जाते. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.