चंद्रपुरात मतदानाची टक्केवारी वाढीसाठी सेल्फी आणि लकी ड्रॉ

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन नवनव्या कल्पना राबवत असते. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तरुणाईमध्ये क्रेझ असणा-या सेल्फीची शक्कल प्रशासनानं राबवायचं ठरवले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 18, 2017, 12:20 PM IST
चंद्रपुरात मतदानाची टक्केवारी वाढीसाठी सेल्फी आणि लकी ड्रॉ title=

चंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन नवनव्या कल्पना राबवत असते. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तरुणाईमध्ये क्रेझ असणा-या सेल्फीची शक्कल प्रशासनानं राबवायचं ठरवले आहे. 

तरुणाईला मतदानासाठी घराबाहेर काढण्याची ही एक नंबरी शक्कल आहे. म्हणूनच प्रशासनानं मतदान करा सेल्फी काढा दिलेल्या व्हॉट्सऍप नंबरवर पाठवा आणि लकी ड्रॉ जिंका अशी योजना घोषित केली आहे. 

यात विजेत्यांना मोबाईल फोनसह 125 बक्षिसं वस्तुरुपात दिली जाणारयत. येवढंच नाही तर शहरातल्या मिठाई दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांनी बोटाची शाई दाखवा बिलात 5 टक्के सुट मिळवा असा उपक्रम सुरू केला आहे. मनपानं डिजीटल बोर्डच्या माध्यमातून चौकाचौकात मतदानासंबंधी जागृती सुरू केलीय.