ठाणे रेल्वे स्टेशनवर आणखी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

Updated: Sep 24, 2016, 10:52 PM IST
ठाणे रेल्वे स्टेशनवर आणखी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे  title=

ठाणे : येथील रेल्वे स्टेशनवर ज्या भागात सीसीटीव्ही नव्हेत तिथे आता सीसीटीव्ही कँमेरा बसवण्यात आलेत. विद्यार्थीने स्वत:च्या पैशातून कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली.

३१ मे रोजी एका तोतया टीसीने वृश्चिका कांबळे या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून त्या तोतया टीसीच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली होती. 

हा सगळा प्रकार तिने आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर या ठिकाणी cctv लावण्याची मागणी या विद्यार्थिनीने रेल्वे प्रशासनाला केली. मात्र नेहमी प्रमाणे रेल्वेने चालढकल केली. 

दरम्यान, वृश्चिकाने आपल्या शिक्षणासाठी ठेवलेल्या पैशांतून त्या ठिकाणी cctv बसवण्याचा निर्णय घेतला. अखेर रेल्वेने त्या ठिकाणी तीन महिन्यांनी cctv बसवले आहेत.