पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Updated: Aug 25, 2016, 05:25 PM IST
पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश title=

 

पुणे : पुण्यात परदेशी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
 
पोलिसांना डेक्कन परिसरात फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपी महिलेची चौकशी करत असून अजून कोण यामध्ये सहभागी आहेत याची माहिती घेत आहे. 
 
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेक्स रॅकेट उघडकीस आली आहेत. याआधी 11 ऑक्टोबर 2013 रोजी दोन उझबेकिस्तानमधील मुलींना पोलिसांनी अटक केली होती. 

तसंच काही दिवसांपूर्वीच पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेलाही पोलिसांनी अटक केली होती.