नाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज बाद

नाशिक महापलिका निवडणुकीत शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत

Updated: Feb 6, 2017, 04:09 PM IST
नाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज बाद title=

नाशिक : नाशिक महापलिका निवडणुकीत शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत, त्यामुळे तूर्तास 122  प्रभागांपैकी फक्त 112 प्रभागात शिवसेनेला अधिकृत उमेदवार देता येणार आहेत.

हा घोळ निस्तरण्यासाठी सेना खासदार अनिल देसाईंनी नाशिकला जाऊन आयुक्तांची त्यांनी भेट घेतली. ज्या एबी फॉर्ममध्ये किरकोळ चुका झाल्यात तिथे उमेदवार शिवसेना पुरस्कृत राहतील.

सेनेच्या दहा उमेदवारांचे फॉर्म रद्द झालेत ते उमेदवार शिवसेना पुरस्कृत राहतील असंही यावेळी अनिल देसाईंनी सांगितलं. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 4, 29 आणि 30 मध्ये गोंधळ झाला होता.