केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.

Updated: Nov 11, 2015, 04:59 PM IST
केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.

कल्याण-डोंबिवलीचे नवे महापौर म्हणून आज शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झालीय. देवळेकरांच्या विरोधात भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज भरला होता. पण आयुक्तांनी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देताच दामलेंनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे देवळकरांची निवड बनविरोध झाली. 

अधिक वाचा : उद्धव ठाकरे आज केडीएमसीत, भाजपला जाणीव करून देण्यासाठी शक्तिप्रदर्शन!

केडीएमसीच्या निवडणुकीत शिवसेनेला ५२ आणि भाजपला ४२ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानं युतीचा फॉर्म्युला ठरला. त्यानुसार आज शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. पुढची अडीच वर्ष राजेंद्र देवळेकर महापौर तर भाजपचे विक्रम तरे उपमहापौर म्हणून काम पाहातील. 

केडीएमसीत शिवसेनेचा महापौर बसणार असल्याचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधी दिला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. कल्याण-डोंबिवलीकरांना शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. त्यामुळे येथील विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वास उद्धव ठाकरे यांनी दिलेय.

अधिक वाचा : केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब

दरम्यान, महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करताना शिवसेना आणि भाजपाकडून अगोदर स्वतंत्र अर्ज दाखल झाले होते. नंतर युतीची घोषणा झाली. वाटाघाटीत पहिले महापौरपद शिवसेनेला मिळणार असल्याने राजेंद्र देवळेकर यांचा मार्ग सुकर झाला होता. भाजपातर्फे महापौरपदाकरिता अर्ज दाखल करणारे राहुल दामले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.