खडसे काका दारूबंदी करा, चिमुरडीची आर्त हाक

Updated: Dec 9, 2015, 07:19 PM IST

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : यवतमाळ ते नागपूर असा 170 किलोमीटरचा पायी प्रवास करुन एक चिमुरडी हिवाळी अधिवेशनावर धडकली....काय कारण होतं ?

प्रेक्षकहो, ऐकलीत या चिमुरडीची आर्त साद...यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी जाहीर करावी अशी या मुलीची मागणी... दारु पिऊन बाप आईला मारझोड करतो...या रोजच्या त्रासाला कंटाळून या चिमुरडीनं दारुबंदीच्या मागणीसाठी यवतमाळ ते नागपूर असं 170 किलोमीटरची अनवाणी पायपीट केली....यवतमाळच्या पाच हजार महिलांनी दारुबंदीच्या मागणीसाठी नागपूर ते यवतमाळ असा प्रवास केला... त्यातच सहभागी झालेल्या या मुलीनं दारुमुळे रोजच्या कटकटीला कंटाळून आपली व्यथा थेट उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसेंसमोर मांडली आणि दारुबंदीची मागणी केली...

आरतीवर ही वेळ तिच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनानं आणलीय...त्यातूनच कदाचित तिला हिंमत मिळाली असावी, १७० किलोमीटर अनवाणी चालण्याची आणि मंत्र्यांसमोर धीटपणे आपली भूमिका मांडण्याची...महाराष्ट्रात अशा आरती सारख्या अनेक चिमुरड्या असतील ज्यांना दारूचे चटके दररोज सहन करावे लागतात...त्यामुळे सरकारनं त्यांचा विचार करावा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.