अकोल्यात एसटी बसला भीषण आग

Updated: Apr 17, 2017, 09:35 PM IST

 

अकोला : अकोल्यात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. सुरत-नागपूर महामार्गावर ही घटना घडली.

खामगावहून अकोल्याच्या दिशेने ही बस येत होती. यावेळी बसने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण बस जळून खाक दिली. 

शॉटसर्किटमुळे बसला आग लागल्याची शक्यता वर्तवली जातेय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.