राज्यात ‘सुकन्या’ योजना लागू होणार?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होतेय. त्यामध्ये राज्यातल्या मुलींसाठी सुकन्या योजना आणण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2013, 12:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होतेय. त्यामध्ये राज्यातल्या मुलींसाठी सुकन्या योजना आणण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.
मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे राज्य सरकार पॉलिसी काढणार आहे. २१ हजार २०० रुपयांची एलआयसी पॉलिसी सरकार सुकन्या योजनेअंतर्गत मुलीच्या नावे काढणार असून तिला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये मिळणार आहे. एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. तसंच एका कुटुंबातील दोन मुलांना याचा लाभ मिळू शकेल.

नववी ते बारावीपर्यंत मुलींना शिष्यवृती देण्याचाही निर्णय सरकार घेणार असून त्याद्वारे दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.