आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

 सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.

Updated: Apr 15, 2015, 06:49 PM IST
आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय title=

सांगली : सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली. सुमन पाटील यांना १ लाख ३१ हजार २३६ मते पडली, तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार स्वप्नील पाटिल यांना अवघी १८ हजार २७३ मते मिळाली.

सुमन पाटील यांच्या विजयी धडाक्यापुढे सर्वच अपक्ष उमेदवारांचेही डिपॉझिट जप्त झाले. सुमन पाटील यांनी 1 लाख 12 हजार 936 मतांच्या फरकाने विजयाची नोंद केली. या विजयानंतर सुमन पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले. तर कार्यकर्त्यांनीही आम्ही आबांना कधी विसरणार नाही आणि ही आमची आबांना श्रद्धांजली असल्याचं म्हटलंय.

तासगावमधील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रयत्न केले होते. त्याला इतर राजकीय पक्षांनी प्रतिसादही दिला होता. मात्र, भाजपचे स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे येथे मतदान घ्यावे लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सुमन पाटील यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. 

तासगावमधील निवडणूक एकतर्फी होणार, असे राजकीय विश्लेषक पहिल्यापासूनच सांगत होते. या मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.