शिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार

औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. 

Updated: Oct 7, 2016, 08:18 PM IST
शिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार  title=

औरंगाबाद : औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. 

त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्या बेमुदत शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक महामंडळ, माध्यमिक शिक्षक संघटना, विना अनुदानित कृती समिती, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, क्रीडा आणि शारीरिक शिक्षक संघटना आणि संस्थाचालक यांची पुण्यात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. \

शिक्षकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी या संघटनांनी सरकारला १३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिलीय. त्यानंतर, परीक्षांवर बहिष्कार घालण्याचं आंदोलन करण्यात येईल, असं या संघटनांच्या वतीनं सांगण्यात आलंय. त्यावरही सरकारने मागण्या मेनी न केल्यास, बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातील बैठकीनंतर या संघटनानी शिक्षण संचालकांना या मागण्याचे निवेदन दिलं. शिक्षक संघटनांच्या या भूमिकेमुळे औरंगाबादच्या घटनेवर शिक्षक आक्रमक असल्याचं दिसतंय. त्यामुळं सरकार पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.