टँकर आणि अॅपे रिक्षाच्या धडकेत सात ठार

येथे झालेल्या टँकर आणि अॅपे रिक्षाच्या अपघातात सात ठार तर आठ जखमी झाल्याची घटना घडली.

Updated: Jun 27, 2015, 06:44 PM IST
टँकर आणि अॅपे रिक्षाच्या धडकेत सात ठार title=

उस्मानाबाद : येथे झालेल्या टँकर आणि अॅपे रिक्षाच्या अपघातात सात ठार तर आठ जखमी झाल्याची घटना घडली.

राष्ट्रीय महामार्गावर उमरग्या जवळील तुरोरी इथं भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षा आणि केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या टँकरची तुरोरी येथे समोरासमोर धडक झाली.
उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे आठवडा बाजारासाठी ग्रामस्थ आले होते.

मृत व्यक्ती धकाटेवाडी आणि थोरलीवाडीचे रहिवासी आहेत. जखमींना उमरगा इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.