नाशिक मनपाच्या शाळेत विद्यार्थी हजर पण शिक्षकच नाहीत

महापालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत. त्यात 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. निवृत्त होणा-यांची संख्या वाढते. त्या तुलनेत पुरेसे शिक्षक नाहीत. 

Updated: Jun 22, 2016, 10:03 PM IST
नाशिक मनपाच्या शाळेत विद्यार्थी हजर पण शिक्षकच नाहीत title=

नाशिक : महापालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत. त्यात 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. निवृत्त होणा-यांची संख्या वाढते. त्या तुलनेत पुरेसे शिक्षक नाहीत. 

मराठी माध्यमाच्या शाळांसाठी मुख्याध्यापकासह 1002 पदं मंजूर आहेत. त्यापैकी 155 रिक्त आहेत. उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी 30 पदं रिक्त आहेत. तर हिंदी माध्यमांच्या शाळांची 6 पदं भरलेली नाहीत. शिपाई पदाच्याही 20 जागा रिक्त आहेत. कला क्रीडा शिक्षकच नसल्याने महापालिकेच्या शाळेत क्रीडा स्पर्धाच होत नाहीत.

सरकारकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही असा सत्ताधारी मनसेचा आरोप आहे. तर शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातल्या अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढल्यामुळे रिक्त पदं भरण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती आमदार देत आहेत. शिक्षकांची पदंच न भरल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होतोय. मेडीकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे राज ठाकरे नाशिक महापालिकेतल्या या प्रकाराबाबत काही मध्यस्ती करणार का असा सवाल गोरगरीब विचारत आहेत.