दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे शहर, गुप्तचर विभागाची माहिती

ठाणे शहर आणि परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवलीय. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे शहर असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. 

Updated: Apr 19, 2015, 07:27 PM IST
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे शहर, गुप्तचर विभागाची माहिती title=

ठाणे: ठाणे शहर आणि परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवलीय. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे शहर असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. 

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांसह एकूण ८४ ठिकाणं ही संवेदनशील असून त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता पोलिसांनी केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे. यातील १२ ठिकाणं ही प्रामुख्यानं अतिसंवेदनशील असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. 

ठाणे शहर, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, वागळे इस्टेट अशी पाच परिमंडळं असलेलं ठाणे पोलीस आयुक्तालय आहे. मुंबईपाठोपाठ महत्त्वाचं असलेलं ठाणेही दहशतवाद्यांच्या रडारवर आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी आतापर्यंत झालेल्या विविध हल्ल्यांचा अभ्यास करून आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील गर्दीस्थळांसह अन्य ठिकाणांची पाहणी केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.