राज्यातील माल वाहतूकदार ट्रक, टेम्पो मध्यरात्रीपासून संपावर

राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2017, 06:27 PM IST
राज्यातील माल वाहतूकदार ट्रक, टेम्पो मध्यरात्रीपासून संपावर title=

पुणे : राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या परिवहन शुल्कातील वाढीपाठोपाठ केंद्र सरकारने वाहतूकदारांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये सुमारे ५० टक्के वाढ केली. तसेच टोलवसुली मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याच्या विरोध करण्यासाठी हा संप असल्याचे माल वाहतूक संघटनेने स्पष्ट केलेय. 

सरकारचे हे धोरण वाहतूकदारांसाठी अन्यायकारक असल्याचं सांगत देशातील माल तसेच प्रवासी वाहतूकदारांनीं चक्का जाम पुकारला आहे. त्याबाबतची बैठक पुण्यात झाली. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील माल वाहतूक म्हणजे सर्व प्रकारचे ट्रक्स , टेम्पो, ट्रेलर तसेच कंटेनरची वाहतूक बंद असणार आहे. 

केवळ खासगी प्रवासी बसेस तसेच स्कूल बसेस सुरु राहतील. मात्र वाहतूकदारांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा न  निघाल्यास येत्या १० तारखेपासून सर्व प्रकारची खासगी वाहतूक थांबवण्याचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे. माल वाहतुकीचे जाचक धोरण रद्द करण्याची मागणी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे.