भीषण अपघातात ३ युवक जागीच ठार

या अपघातात संगमनेर मधील दोन जणांचा तर जामखेड मधील एकाचा मृत्यू झाला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 14, 2017, 06:46 PM IST
भीषण अपघातात ३ युवक जागीच ठार title=

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर बायपास नजीक प्रवरा नदीवरील पुलाला गाडी धडकून झालेल्या भिषण अपघतात तीन युवक ठार झालेत हि घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून.या अपघातात संगमनेर मधील दोन जणांचा तर जामखेड मधील एकाचा मृत्यू झाला आहे. 

आदित्य तिवारी, संकेत बोरा, प्रथमेश भिंगारे असं या युवकांचं नाव आहे. पुणे इथे हे तीन युवक CA चे शिक्षण घेत होते.पुणे-येथून संगमनेर येथे येत असताना हा अपघात झाला असून.या अपघातात गाडीचा चक्का चूर झाला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी दिशा दर्शक फलक नसल्यानं  पुलावर गाडी धडकून अपघात झाल्याचा आरोप मयत युवकांच्या नातेवाईकानी केला आहे.