ठाणेकरांचा बसप्रवास महागला, किमान भाडं २ रुपयांनी वाढलं

ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू झालीय. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना पाच ऐवजी सात रुपये मोजावे लागतील. 

Updated: Jul 17, 2015, 10:03 AM IST
ठाणेकरांचा बसप्रवास महागला, किमान भाडं २ रुपयांनी वाढलं title=

ठाणे: ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू झालीय. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना पाच ऐवजी सात रुपये मोजावे लागतील. 

दुसऱ्या टप्प्यासाठी ३ रुपये आणि त्यापुढच्या टप्प्यासाठी ५ रुपयांची वाढ करण्यात आलीय. डिझेल दरवाढीचं कारण या भाडेवाढीला देण्यात आलंय. याशिवाय एसी बसलाही भाडेवाढ करण्यात आलीय.  

पहिल्या टप्प्यासाठी ५ रुपये दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि त्यापुढच्या टप्प्यासाठी १५ रुपयांची भाडेवाढ करण्यात आलीय. दोन वर्षांपूर्वी टीएमटीनं १ रुपयाची भाडेवाढ केली होती. त्यानंतर आता ही भाडेवाढ करण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.