पूर असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं जीवावर

जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातल्या पानाखासच्या नाल्याला पूर आला असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं युवकांच्या अंगाशी आलं. यामध्ये दोन युवक वाहून गेले. त्यापैकी एका युवकानं झाडाला पकडल्यानं तो बचावला. पण दुसरा अजूनही बेपत्ता आहे.

Updated: Jul 25, 2014, 07:44 PM IST
पूर असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं जीवावर title=

बुलडाणा : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातल्या पानाखासच्या नाल्याला पूर आला असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं युवकांच्या अंगाशी आलं. यामध्ये दोन युवक वाहून गेले. त्यापैकी एका युवकानं झाडाला पकडल्यानं तो बचावला. पण दुसरा अजूनही बेपत्ता आहे.

गेल्या काही दिवसापासून या परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलाय. त्यामुळे शेगाव आकोट मार्ग बंद आहे. तर पूर्णा नदीत मिळणा-या पानाखासच्या नाल्यालाही पूर आलाय. या पुरातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मलकापूर तालुक्यातल्या गोपाळ पांडे आणि उमेश मुरेकर या दोन युवकांनी केला.

या नाल्याच्या पुलावरुन बाईक नेत असताना हे दोघं वाहून गेले. गोपाळनं बाभळीच्या झाडाला पकडल्यानं तो वाचला. तर उमेश पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरु आहे. 

पूर्णा नदीत मिळणाऱ्या नया अंदुरा ता. बाळापुर येथील पानाखासाच्या नाल्याला पूर असतांना अतिधाडस करून मोटारसायकलने नाला ओलांडण्याचा प्रयत्न करणे दोन युवकांना महागात पडले. मागील दोन दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे शेगाव आकोट मार्ग बंद आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.