जुन्या नोटा स्वीकारण्याच्या नकाराने दोन दिवसांत दूध संकट, विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा

ठाण्यात एक दोन दिवसांत दूध संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. किरकोळ दूध विक्रेत्यांकडून पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास ठाण्यातील वितरकांचा नकार दिला आहे. या निर्णयाविरोधात विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Nov 18, 2016, 06:53 PM IST
जुन्या नोटा स्वीकारण्याच्या नकाराने दोन दिवसांत दूध संकट, विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा title=

ठाणे : ठाण्यात एक दोन दिवसांत दूध संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. किरकोळ दूध विक्रेत्यांकडून पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास ठाण्यातील वितरकांचा नकार दिला आहे. या निर्णयाविरोधात विक्रेत्यांचा दूधबंदीचा इशारा देण्यात आला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मेडिकल, पेट्रोलपंप आणि दूध विक्रेत्यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकाराव्यात असे आदेश दिले होते. मात्र गोकुळ, महानंदा, अमूल यासारख्या बड्या कंपनीच्या ठाण्यातील काही वितरकांनी किरकोळ दूध विक्रेत्यांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

जुन्या नोटा दिल्यास दूध मिळणार नाही असे पत्रच काही वितरकांनी किरकोळ दूध विक्रेत्यांना पाठवलंय. त्यामुळं किरकोळ दूध विक्रेत्यांनीही या निर्णयाविरोधात दूधविक्री बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. वितरक आणि किरकोळ विक्रेते यांच्यात चर्चा सुरु असून जिल्हा प्रशासनानंही या दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जाते आहे. मात्र, यावर तोडगा निघाला नाही तर ठाण्यात एक दोन दिवसांत दूधटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.