उद्धव ठाकरेंनी चोळले भाजपच्या जखमेवर मीठ

 भाजपमध्ये लेटरबॉम्बचा स्फोट झाला असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षाला चांगलेच चिमटे काढलेत. एवढंच नव्हे तर नितीशकुमार यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे संकेत देऊन, त्यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलंय...

Updated: Nov 11, 2015, 05:25 PM IST
उद्धव ठाकरेंनी चोळले भाजपच्या जखमेवर मीठ title=

कल्याण :  भाजपमध्ये लेटरबॉम्बचा स्फोट झाला असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षाला चांगलेच चिमटे काढलेत. एवढंच नव्हे तर नितीशकुमार यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे संकेत देऊन, त्यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलंय...

भाजपमध्ये लेटरबॉम्ब फुटला आहे, तर त्याबद्दल त्यांच्या पक्षातील आमदार बोलताहेत खासदार बोलताहेत, बॉम्ब फुटला तर बोंबाबोंब होणार मी याबद्दल काही बोलणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा शपथ घेतली तेव्हा मी उपस्थित राहायचे की नाही याचा विचार करतो आहे. मी कधी तिकडे गेलो तर त्यांना भेटतो, ते आल्यावर मला भेटतात असे म्हणून भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. 

केडीएमसी : राजेंद्र देवळेकर नवे महापौर 

कल्याण-डोंबिवलीचे नवे महापौर म्हणून आज शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झालीय. देवळेकरांच्या विरोधात भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज भरला होता. पण आयुक्तांनी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देताच दामलेंनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे देवळकरांची निवड बिनविरोध झाली. 

केडीएमसीच्या निवडणूकीत शिवसेनेला 52 आणि भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानं युतीचा फॉर्म्युला ठरला. त्यानुसार आज शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. पुढची अडीच वर्ष राजेंद्र देवळेकर महापौर तर भाजपचे विक्रम तरे उपमहापौर म्हणून काम पाहातील असं.

दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंही या निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. निवडणूकीच्या जरी वेगवेगळो लढलो असलो, तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी भाजपची साथ घेतल्याचं स्पष्टीकरण यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.