ठाणे पालिका उभारणार भूमिगत वाहनतळ

शहरात दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच वाढत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय करण्यात आलाय. ५ हजार चौरस मीटरवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Updated: Aug 22, 2015, 12:15 PM IST
ठाणे पालिका उभारणार भूमिगत वाहनतळ  title=

ठाणे : शहरात दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच वाढत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय करण्यात आलाय. ५ हजार चौरस मीटरवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यामुळे ठाण्यात जमिनीखाली पार्किंगचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे एकावेळी ३०० दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्क करता येणार आहेत. गावदेवी मैदानातील ५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर भूमिगत वाहनतळ तयार केले जाणार आहे.  त्याचवेळी अद्यावत असे मैदानही साकारले जाणार आहे.

ठाणे पश्चिमेकडे नागरी वसाहतींची वाढ होत आहे. त्यामुळे  लोकसंख्येत मोठा भर पडत आहे. स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केलेय. मात्र, ती पुरेशी पडत नाही. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.
 
गावदेवी मैदानाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७५०० चौरस मीटर इतके असून यापैकी ५५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर हे वाहनतळ उभारले जाणार आहे. या कामासाठी सुमारे २७ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाच्या निविदा येत्या काही दिवसांत काढल्या जातील, अशी माहिती ठाणे पालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.