VIDEO : समाजाचा बोथटपणा यातून तरी जाईल का?

अपघातग्रस्ताला त्याचक्षणी मिळालेली मदत त्याच्यासाठी जीवदान ठरू शकते. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असते, पण प्रत्यक्षात मदतीसाठी पुढे यायला कोणी धजावत नाही. नागरिकांच्या मनातली ही नकारात्मकता घालवण्यासाठी एका वाहतूक पोलिसाने चक्क लघूपटाच्या माध्यमातून जागरूकता करण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Aug 5, 2015, 09:21 AM IST
VIDEO : समाजाचा बोथटपणा यातून तरी जाईल का? title=

पुणे : अपघातग्रस्ताला त्याचक्षणी मिळालेली मदत त्याच्यासाठी जीवदान ठरू शकते. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असते, पण प्रत्यक्षात मदतीसाठी पुढे यायला कोणी धजावत नाही. नागरिकांच्या मनातली ही नकारात्मकता घालवण्यासाठी एका वाहतूक पोलिसाने चक्क लघूपटाच्या माध्यमातून जागरूकता करण्याचा प्रयत्न केलाय. 

देशात दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. एक महत्त्वाचा संवेदनशील विषय आहे हा... पुणे पोलीस दलातल्या वाहतूक शाळेतले एपीआय महेश सरतापे यांच्यासाठी रस्ते अपघात हा रोजचाच विषय... अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही हा अनुभव मात्र त्यांना उद्वीग्न करून गेला. या उद्वीग्ननेतून निर्माण झाला एक लघुपट... कथा पटकथा संवाद दिग्दर्शन अभिनय अशा सगळ्या बाजू सांभाळत त्यांनी 'हेल्पिंग हँड्स' हा लघूपट तयार केलाय.

एका सुखी कुटुंबाची ही कहाणी आहे. सिनेमाला जायला उशीर झाला म्हणून अपघातग्रस्ताला मदत न करता पुढे निघून गेलेल्या कुटुंबाला नंतर आपलाच मुलगा अपघातग्रस्त झाला असल्याचं समजतं... हा आशय असलेली ही संवेदनशील कहाणी... 

एका सामान्य माणसाने प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतीमुळे लघुपटातल्या अपघातग्रस्त तरूणाचा जीव वाचतो. हा कालावधी अपघातग्रस्तासाठी गोल्डन अवर ठरतो. मात्र हे भाग्य प्रत्येक अपघातग्रस्ताला लाभावं, समाजाने कोणताही किंतू मनात न ठेवता पुढे यावं हा संदेश 'हेल्पींग हँड्स' देऊन जातो. गणेशोत्सव काळात हा लघूपट दाखवून गणेशोत्सव मंडळांनी प्रबोधन घडवावं अशी वाहतूक पोलिसांची अपेक्षा आहे. त्यासाठी इच्छूक मंडळांनी वाहतूक शाखेकडे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.